"To establish, develop, and maintain a library at the national level…"
⦿ छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून कंपनी कायदा, 2013 च्या कलम 8 अंतर्गत नोंदणी करण्याकरीता शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार संस्थेची दिनांक 25 जून 2018 रोजी स्थापना करण्यात आली आहे. दिनांक 11/2/2019 पासून सारथी संस्था कार्यान्वित करण्यात आली.
⦿ सध्या ग्रंथालयात सामाजिक शास्त्र या विषयांतर्गत विविध थोर समाजसुधारकांच्या विचारांची तसेच प्रशासन, अध्यात्मिक, व्यक्तिमत्त्व विकास, अंधश्रद्धा, एैतिहासिक, ग्रामीण विकास, संशोधनात्मक, महिलांविषयक, आरोग्य, संदर्भ ग्रंथ-शब्दकोश, मराठी विश्वकोश, जिल्हा गॅझेटिअर, कृषीशास्त्र, चरित्र-आत्मचरित्र, लेखसंग्रह अशा विविध विषयांवर नामवंत लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश आहे.
⦿ सध्या ग्रंथालयात मराठी व इंग्रजी भाषेतील मिळून सुमारे २ हजार पुस्तके आहेत.
⦿ संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सारथी संस्थेच्या ग्रंथालयात मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाकरिता समाजोपयोगी व प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश केला जातो.
“Various proposed services and facilities provided through the library.”
ग्रंथालयात दिल्या जाणाऱ्या प्रस्तावित विविध सेवा आणि सुविधा
1. Reference service संदर्भ सेवा
2. Bibliographical service ग्रंथसूची सेवा
3. photocopying service छायांकित प्रत सेवा
4. Newspaper Clipping Service वृत्तपत्र कात्रण सेवा
5. Referral Services संदर्भित सेवा
6. Current Awareness Services/CAS सद्य जागरूकता सेवा
7. Article indexing service लेख सूची सेवा
8. Online search of library database ग्रंथालय डेटाबेसचे ऑनलाइन शोध
9. Audio visual and Internet facility ध्वनिचित्र व इंटरनेट सुविधा
10. Library Membership ग्रंथालय सदस्यत्व
11. Book Issue-Return ग्रंथ देव-घेव
12. Newspaper वृत्तपत्र
13. Periodical नियतकालिक
14. Reading Hall वाचन कक्ष/अभ्यासिका
15. Library OPAC Link:- https://eg4.nic.in/OPAC/Default.aspx?CL_NAME=ATI&LIB_CODE=SARTHILIB